cbse portal

विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान त्यांना मिळावे म्हणून सीबीएसई बोर्डाने(CBSE portal) एक ई-परीक्षा (e-pareeksha portal) पोर्टल लॉन्च केले आहे. cbse.gov.in या वेबसाईटवर हे पोर्टल देण्यात आले आहे. 

    मुंबई: देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम ३०  टक्क्यांनी कमी केला आहे. कोरोनाकाळात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान त्यांना मिळावे म्हणून सीबीएसई बोर्डाने(CBSE portal) एक ई-परीक्षा (e-pareeksha portal) पोर्टल लॉन्च केले आहे. cbse.gov.in या वेबसाईटवर हे पोर्टल देण्यात आले आहे.

    सध्याविद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यावर भर आहे. येत्या ४ मेपासून सीबीएसई बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होणार आहेत. त्याआधी बोर्डाने २०२१ या शैक्षणिक वर्षात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ई-परीक्षा पोर्टल लॉन्च केलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थांना परीक्षा देणे सोपे जाईल.

    ई-परीक्षा पोर्टल या लिंकवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती मिळेल.विद्यार्थ्यांना हे पोर्टल वारण्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून, ई-परीक्षा पोर्टलचे (e-pareeksha portal) अनेक भाग करण्यात आले आहेत. या पोर्टलच्या मदतीने विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा केंद्र, प्रॅक्टिकल केंद्रात बदल करण्यात येईल. याच पोर्टलवर दहावीच्या विद्यार्थ्यांचे इंटरनल असेसमेंट आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे इंटरनल ग्रेड अपलोड केले जातील.