दहावी आणि बारावीतील परीक्षेच्या पॅटर्नबाबत सीबीएसई बोर्डाची मोठी घोषणा, ‘या’ बदलांमुळे होणार विद्यार्थ्यांना फायदा

लखनऊ पब्लिक कॉलेजिएटचे जावेद आलम खान म्हणाले की, मॉडेल पेपरदेखील त्याच आधारे तयार केला आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी घोका आणि गुण मिळवा या ऐवजी विषय समजून घेऊन परीक्षा द्या, यावर भर दिला आहे. परीक्षेत सामाजिक विज्ञान पेपरमधील एकाधिक निवड प्रश्नांची संख्या २० वरून १६ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : सीबीएसई (CBSE) बोर्डानं परीक्षेच्या पॅटर्नबाबत मोठी घोषणा केली आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या पेपरचा ( 10th and 12th Exams )  पॅटर्न (Pattern Change)  बदलण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष २०२१ पासून तो लागू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी ८० मार्कांच्या (Marks) पेपरमध्ये २७ गुण तर ७० गुणांच्या पेपरमध्ये २३ तसेच ३० गुणांच्या पेपरसाठी १० गुण मिळणं अत्यावश्यक आहे. या बदलांमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लखनऊ पब्लिक कॉलेजिएटचे जावेद आलम खान म्हणाले की, मॉडेल पेपरदेखील त्याच आधारे तयार केला आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी घोका आणि गुण मिळवा या ऐवजी विषय समजून घेऊन परीक्षा द्या, यावर भर दिला आहे. परीक्षेत सामाजिक विज्ञान पेपरमधील एकाधिक निवड प्रश्नांची संख्या २० वरून १६ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विज्ञान विषयामध्ये ३२ ऐवजी ३६ प्रश्न विचारले जातील. गणिताच्या पेपरमध्ये केस स्टडीचे चार प्रश्न असतील. वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या २० वरून १६ करण्यात आली आहे.

अशा पद्धतीचा अभ्यासक्रम आणि पेपर पद्धतीमुळे विद्यार्थी केवळ विषयाची घोकंपट्टी करून मार्क मिळवणार नाहीत तर विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी केस स्टडीवर आधारीत प्रश्न विचारल्यानं विद्यार्थ्यांना आवांतर वाचन आणि चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची क्षमता वाढीस लागेल त्याचा फायदा होईल असंही शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे.