yogasan

मोदी सरकारने(Modi Goverment) योगासंदर्भात संपूर्ण जगात जनजागृती केली. त्यामुळे अनेक देशांना कोरोनाशी(Corona) लढायला मदत झाली आहे असे वक्तव्य केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक(Shreepad Naik) यांनी केलं आहे.

    रामदेवबाबांनंतर एका केंद्रीय मंत्र्याने(Central Minister) योगामुळे अनेकांनी कोरोनावर मात केल्याचे म्हटले आहे. मोदी सरकारने योगासंदर्भात संपूर्ण जगात जनजागृती केली.त्यामुळे अनेक देशांना कोरोनाशी लढायला मदत झाली आहे असे वक्तव्य केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक(Shreepad Naik) यांनी केलं आहे. शुक्रवारी नाईक पणजी येथे कोरोना उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘आयुष’ ६४ ’औषधाच्या वितरणाच्या प्रसंगी हे भाष्य केलं आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant)देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

    नाईक म्हणाले “नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ७ वर्षापूर्वी २१ जून या दिवशी जागतिक स्तरावर योग दिन साजरा करण्यास सुरुवात केली होती. ज्यामुळे योगाबद्दल लोकांमध्ये  जागरुकता निर्माण झाली.

    नाईक पुढे म्हणाले की, “आता अनेक देशांना कोरोनाशी लढण्यासाठी योगाचे किती महत्त्व आहे हे कळलं आहे. कारण त्यांना याच्या फायद्याबद्दल माहिती देण्यात आली आहे .” पंतप्रधान मोदींना दूरदर्शीपणा दाखवला. त्यांनी मानवी जीवनातील शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक पैलूंवर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्राचीन प्रथेविषयी जगाला जागृत केल्याबद्दल त्यांचे कौतुक नाईक यांनी केले.

    कोविड -१९ उपचारांमध्ये राज्य सरकार आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) च्या चिकित्सकांची मदत घेत असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

    “राज्यातील सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये आयुष क्लिनिकदेखील सुरू करण्यात आले आहेत.या क्लिनिकमध्ये कोविडमधून बरे झाल्यानंतर इतर आरोग्यविषयक येणाऱ्या समस्यांवर उपचार केले जातात असे,” सावंत म्हणाले.