Battle with Koronashi; Remadesevir, important information provided by the FDA on oxygen storage

केंद्र सरकारने(central government contact many countries for remdesivir) इजिप्त, उज्बेकिस्तान, यूएई आणि बांग्लादेशकडून रेमडेसिवीर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून या देशांशी संपर्कही सुरू केला आहे. 

    नवी दिल्ली: देशात रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा(shortage of remdesivir injection) निर्माण झाला आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीची पावलं उचलली आहेत. केंद्र सरकारने(central government contact many countries for remdesivir) इजिप्त, उज्बेकिस्तान, यूएई आणि बांग्लादेशकडून रेमडेसिवीर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून या देशांशी संपर्कही सुरू केला आहे.

    अमेरिकेची फार्मा कंपनी गिलीएड सायन्सने भारताला ४.५० लाख इंजेक्शन देण्यास होकार दिला आहे. तसेच भारतात रेमडेसिवीरचं उत्पादन वाढावं म्हणून कच्चा माल देण्याचाही निर्णय घेतला आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा पाहता केंद्राने रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातली होती. केंद्राने रेमडेसिवीरचं प्रत्येक महिन्याचं उत्पादन ७८ लाख वायल पर्यंत वाढवण्याचं आधीच सांगितलं होतं. रेमडेसिवीरच्या सात मॅन्यूफॅक्चर्सची सध्याची उत्पादन क्षमता ३८.८०लाख वायल प्रत्येक महिन्याचं असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं होतं.

    शुक्रवारी अमेरिकेडून ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कन्स्ट्रटेरसहीत इतर औषधांची पहिली खेप येण्याची शक्यता आहे. सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका एस्ट्राजेनेकाचे एक कोटी डोस भारताला देणार आहे. त्या शिवाय पाच कोटी डोसचे उत्पादन विविध टप्प्यात आहे. भारताने अमेरिकेकडे व्हॅक्सिनच्या तयार डोससह कोविड व्हॅक्सिनच्या उत्पादनासाठी कच्च्या मालाची मागणीही केली आहे.

    अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, बेल्झियम, रोमानिया, लक्समबर्ग, सिंगापूर, पोर्तुगाल, स्विडन, न्यूझीलंड, कुवेत आणि मॉरिशससहीत अनेक देशांनी भारताला मदतीचा हात दिला आहे. सिंगापूरने भारताला २५६ ऑक्सिजन सिलिंडर गिले आहेत. नॉर्वे सरकारनेही भारताला वैद्यकीय सेवेसाठी २४ लाख अमेरिकन डॉलर्सची मदत देणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच स्वित्झर्लंडनेही भारताला ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, व्हेंटिलेटर आणि अन्य वैद्यकीय उपकरणे देत आहे.