केंद्र सरकारकडून शाळा, चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी…

केंद्र सरकारकडून अनलॉक ५ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबाबतचा आदेश जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारनं अनलॉकच्या ५व्या टप्प्यात चित्रपटगृह व शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असली, तरी शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्यांकडे सोपवला आहे.

केंद्र सरकारने अनलॉकच्या ५व्या टप्प्यात चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. चित्रपटगृह सुरू करण्यासाठी एकूण क्षमतेच्या ५० टक्केच प्रेक्षकांना प्रवेश देण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर मल्टिप्लेक्स, थिअटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.प्रेक्षकांना बसवण्यासंदर्भातील नियमावली माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात येईल, असं केंद्रानं म्हटलं आहे.