covishield vaccine

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सध्या १२ ते १६ आठवडे आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतरGap Between Two Doses  Of Covishield will Be Reduced) आता पुन्हा कमी करण्याचा सल्ला केंद्र सरकारला देण्यात आला आहे.

    नवी दिल्ली : केंद्र सरकार लसीकरणाबाबत(Vaccination Update) एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी होण्याची शक्यता आहे. सध्या देशात दिल्या जाणाऱ्या इतर लशींच्या तुलनेत कोविशिल्ड (Covishield Vaccine) लशीच्या दोन डोसमध्ये सर्वात जास्त अंतर आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सध्या १२ ते १६ आठवडे आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतरGap Between Two Doses  Of Covishield will Be Reduced) आता पुन्हा कमी करण्याचा सल्ला केंद्र सरकारला देण्यात आला आहे.

    इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन (IAPSM) या संस्थेने केंद्र सरकारला कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस केली आहे. यावर केंद्र सरकार विचार करत आहे. कोरोना संसर्ग झालेल्यांना लस न देण्याचाही सल्ला संस्थेने दिला आहे.

    इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन या संस्थेच्या अध्यक्ष डॉ. सुनीला गर्ग यांनी सांगितलं की, आम्ही लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा सल्ला दिला आहे. जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण ही आमची प्राथमिकता आहे. ज्यांना कोरोना संसर्ग झाला आहे, त्यांना कोरोना लस देऊ नका, असाही सल्ला आम्ही दिला आहे.

    देशात सहा कंपन्यांच्या लशींना परवानगी मिळाली आहे. दोन डोसमधील अंतर कमी झालं तर जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण होईल आणि कोरोना रुग्णांना गंभीर होण्यापासून किंवा रुग्णालयात दाखल होण्यापासून दूर ठेवता येईल.ज्या लोकांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना एक डोस घेतलेल्यांच्या तुलनेत संसर्गाचा धोका कमी असतो, असं दिसून आलं आहे. त्यामुळे दोन डोसमधील अंतर कमी केल्याने लोकांना कमी कालावधीच दोन्ही डोस मिळतील, ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होईल, असं संस्थेने सांगितलं. डेल्टा व्हेरिएंटमुळे लोकांमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे आता दोन डोसमधील अंतर कमी करणे आवश्यक आहे.

    सुरुवातीला कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंंतर ४ ते ६ आठवडे होते. त्यानंतर ते वाढवून ४ ते ८ आठवडे करण्यात आलं. कालांतराने १२ ते १८ आठवडे करण्यात आलं. हे अंतर वाढवण्यावरून वादही झाला होता. लसीकरणाबाबत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते.लसींचा तुटवडा होता त्यामुळे लसीमधील अंतर जास्त होतं.