आली रे आली केंद्राची नवी नियमावली, स्विमींग पूल आणि चित्रपटगृहे जास्त क्षमतेने होणार खुली

चित्रपटगृह(cinema hall) आणि स्विमींग पूल(swimming pool)  मर्यादीत स्वरुपात खुले करण्यास परवानगी देण्यात आली होती.मात्र आता चित्रपटगृह आणि स्विमींग पूल अधिक क्षमतेने वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत नवा आदेश(new guidelines from home ministry) काढला आहे.

कोरोनाचा (corona)प्रसार रोखण्यासाठी गर्दी होऊ नये असे प्रयत्न केले जात होते. त्यासाठी अनेक गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले होते.चित्रपटगृह(cinema hall) आणि स्विमींग पूल(swimming pool)  मर्यादीत स्वरुपात खुले करण्यास परवानगी देण्यात आली होती.मात्र आता चित्रपटगृह आणि स्विमींग पूल अधिक क्षमतेने वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत नवा आदेश(new guidelines from home ministry) काढला आहे. १ ते २८ फेब्रुवारी या कालावधीसाठी हा आदेश लागू असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले आहे. त्यासंदर्भातील नवा एसओपी काढण्यात आला आहे.


या एसओपीमध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले की, निरीक्षण, कंटेन्मेंट झोन आणि सुरक्षेबाबत जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हे निर्देश १ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहेत. तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कन्टेंमेंट झोनबाहेर सर्व व्यवहारांना परवानगी असेल. सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांना राज्यांच्या एसओपींप्रमाणे परवानगी दिली जाईल. देशातील प्रवासाबाबतचे अनेक निर्बंधही नव्या एसओपीत हटवण्यात आले आहेत.