cruise

क्रूझ पर्यटन (cruise tourism)एक विकसनशील क्षेत्र असून त्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याची गरज असून भविष्यात राज्य, केंद्र सरकारसाठी महसूल प्राप्तीचे हे महत्त्वाचे साधन होऊ शकते, असे मत संसदीय समितीने व्यक्त केले आहे.

    दिल्ली: संसदेच्या स्थायी समितीने समुद्रावर आधारित क्रूझ पर्यटनाला(cruise tourism) मिळत असलेला प्रतिसाद पाहता या क्षेत्रावर(cruise tourism in India) विशेष लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. यासोबतच क्रूझ टर्मिनल आणि बंदरांवर सुलभ शुल्क तसेच पायाभूत प्रकल्पांचा विकास करण्याचाही प्रस्ताव दिला आहे.

    समितीने विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारने पावले उचलावी, असेही म्हटले आहे. क्रूझ पर्यटन एक विकसनशील क्षेत्र असून त्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याची गरज असून भविष्यात राज्य, केंद्र सरकारसाठी महसूल प्राप्तीचे केंद्र होऊ शकते,असेही मत समितीने व्यक्त केले. बंदरांचा विकास झाल्यास रोजगाराची निर्मिती होण्यास प्रोत्साहन मिळू शकते, असेही समितीचे म्हणणे आहे.