health minister mansukh mandviya

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया(Health Minister Mansukh Mandaviya) यांनी राज्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. शिक्षक दिन (Teachers Day)अर्थात ५ सप्टेंबर रोजी सर्व शालेय शिक्षकांचं प्राधान्याने लसीकरण(Vaccination Of School Teachers On Priority) करण्यात यावं, असे मांडविया यांनी राज्यांना सांगितले आहे.

    या महिन्यात राज्यांना दोन कोटींपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे(Corona Vaccination) डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया(Health Minister Mansukh Mandaviya) यांनी राज्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. शिक्षक दिन (Teachers Day)अर्थात ५ सप्टेंबर रोजी सर्व शालेय शिक्षकांचं प्राधान्याने लसीकरण(Vaccination Of School Teachers On Priority) करण्यात यावं, असे मांडविया यांनी राज्यांना सांगितले आहे.

    मनसुख मांडविया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “या महिन्यात प्रत्येक राज्याला ठराविक लसीचा ठराविक पुरवठा करण्यात येईल. याशिवाय २ कोटींपेक्षा अधिक डोस पुरवण्यात येतील. ५ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या शिक्षक दिनापूर्वी सर्व शालेय शिक्षकांचं प्राधान्याने लसीकरण करण्याचा प्रयत्न करा.”

    कोरोनाला रोखम्यासाठी मार्च २०२०मध्ये भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली होती. अनेक राज्यांनी शाळा अंशतः पुन्हा सुरू करण्यास सुरुवात केली. अशातच एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शाळा – महाविद्यालया पुन्हा बंद करण्यात आली.

    देशातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यांनी शाळा पुन्हा उघडण्यास परवानगी दिली आहे. शाळा सुरू होत असल्या तरी अनेक शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे शिक्षकांचं प्राधान्याने लसीकरण करण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली होती. त्याची आरोग्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे.