घाबरून रुग्णालयांमध्ये गर्दी करु नका,घरून डॉक्टरांच्या मदतीनेही बरे होऊ शकता – केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा सल्ला

घाबरुन उगाच इकडे तिकडे पळापळ करु नका. बहुतांश रुग्ण हे डॉक्टरांच्या संपर्कात राहून घरीच बरे होऊ शकतात. मी हे केवळ आरोग्यमंत्री म्हणून नाही तर एक डॉक्टर म्हणून हे सांगत आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी(central health minister) सांगितले आहे.

    देशभरातील वेगवेगळ्या शहरांमधून ऑक्सिजनच्या तुटवड्याची तक्रार येत आहे. मात्र केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन(dr. harshwardhan) यांनी देशामध्ये ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा असून इतर ठिकाणांहूनही ऑक्सिजन मागवला जात असल्याची माहिती दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी लोकांनी घाबरुन जाण्याचं कारण नसल्याचं सांगत घरी बसूनही अनेकजण बरे झाल्याचं म्हटलं आहे.

    उद्योग जगताबरोबरच परदेशातून आणि स्टोरेज टँकर्स आणि क्रायोजेनिक टँकर्सच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा केला जात असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

    ऑक्सिजन पुरवठा केला जात असला तरी ऑक्सिनसंदर्भातील योग्य माहिती असणंही गरजेचं आहे, असंही आरोग्यमंत्री म्हणाले आहेत. घाबरुन थेट रुग्णालयांमध्ये जाऊन गर्दी करण्याची गरज नाही. ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांना तो मिळालाच पाहिजे. मात्र पुरेशी माहिती नसल्याने एखाद्याने ऑक्सिजन मिळालाच पाहिजे असं म्हणणं किंवा वाटणं चुकीचं आहे, असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

    घाबरुन उगाच इकडे तिकडे पळापळ करु नका. बहुतांश रुग्ण हे डॉक्टरांच्या संपर्कात राहून घरीच बरे होऊ शकतात. मी हे केवळ आरोग्यमंत्री म्हणून नाही तर एक डॉक्टर म्हणून हे सांगत आहे, असंही हर्षवर्धन म्हणाले आहेत.