प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

“बहुतेक वेळा लहान मुलांमध्ये(Corona Spread To Children) आढळून येणाऱ्या कोरोनाच्या(Corona) प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणं नसतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ खचितच येते. काही मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते, पण त्यांचं प्रमाण खूप कमी असू शकेल”, असं डॉ. पॉल यांनी सांगितलं आहे.

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये(Corona Third Wave) लहान मुलांना(Corona Spread To Small Children) सर्वाधिक धोका असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात अनेक दावे, प्रतिदावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.

  “लहान मुलांमध्ये कोरोना आढळला, तरी तो बहुतेक वेळा असिम्पटोमॅटिक अर्थात लक्षणविरहीत असतात. सुदृढ मुलांनी रुग्णालयात दाखल न करताही अत्यंत सौम्य लक्षणांसह कोरोनावर मात केली आहे. सहव्याधी असणाऱ्या किंवा प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या मुलांनाच रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते”, असं आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याआधी केंद्रीय व्यवस्थेतील अनेक तज्ज्ञांनी यासंदर्भात मांडलेल्या भूमिकेचा यासाठी दाखला देण्यात आला आहे.


  निती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

  “बहुतेक वेळा लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणं नसतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ खचितच येते. काही मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते, पण त्यांचं प्रमाण खूप कमी असू शकेल”, असं डॉ. पॉल यांनी सांगितलं आहे.

  १ जून रोजीच पॉल यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही भूमिका मांडली होती. त्यासोबतच, “कोरोनाची लागण होण्याची शक्यता असणाऱ्या मुलांवर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या आरोग्य सुविधांची उभारणी करण्यासारख्या उपाययोजना केल्या जात आहेत”, असं देखील पॉल यांनी नमूद केलं होतं.

  दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पीआयबीच्या माध्यमातून जारी केलेल्या परिपत्रकामध्ये एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांनी ८ जून रोजी यासंदर्भात दिलेलं स्पष्टीकरण देखील नमूद केलं आहे. “भारत किंवा जगभरातून असा कोणताही डाटा मिळालेला नाही ज्यावरून हे सिद्ध होऊ शकेल की लहान मुलांवर कोरोनाच्या पुढच्या लाटांचा गंभीर परिणाम होईल. सुदृढ मुलं यावर सौम्य लक्षणांनीही मात करू शकतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत नाही”, असं गुलेरिया यांनी स्पष्ट केलं आहे.

  दरम्यान, लहान मुलांना कोरोनापासून पूर्णपणे संरक्षण देण्यासाठी कोवॅक्सिन लसीची चाचणी लहान मुलांवर सुरू करण्यात आली आहे. NTAGI गटाचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी यासंदर्भात २५ जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे. “२ ते १८ या वयोगटातल्या मुलांवर कोवॅक्सिनची चाचणी सुरू करण्यात आली आहे. या चाचणीचे निष्कर्ष सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये हाती येतील. मुलांना करोनाची लागण होऊ शकते पण ते गंभीर आजारी पडणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.