डिसेंबरपर्यंत सगळ्या भारतीयांच होणार लसीकरण, प्रकाश जावडेकरांनी दिली माहिती

डिसेंबरपर्यंत(December) सर्व भारतीयांचं लसीकरण(All Indians Vaccination) पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर(Prakash Javdekar) यांनी दिली आहे.

    लसींचं उत्पादन(Vaccination Production) येत्या ऑगस्टपासून वाढणार असून डिसेंबरपर्यंत सर्व भारतीयांचं लसीकरण पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर(Prakash Javdekar) यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत(Press Conference) ते बोलत होते.


    यावेळी त्यांनी स्वदेशी, परदेशी अशा सर्व लसींबाबत माहिती दिली. राहुल गांधी यांनी लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचं सांगितल्यावर त्यांनी आपल्याकडची लसीकरणाविषयीची महत्त्वाची माहिती सादर केली. ते म्हणाले, “आत्तापर्यंत २० कोटी नागरिकांचं लसीकरण झालं आहे. डिसेंबरपर्यंत २१८ कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे १०८ कोटी नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार आहे.”

    “कोविशिल्ड, कोवॅक्सिन, झायडस कॅडिला, नोवावॅक्स, जेनोवा, स्पुटनिक अशा देशात तयार होणाऱ्या आणि परदेशातून मागवण्यात आलेल्या सर्व लसी उपलब्ध होणार आहेत. या सगळ्या लसींच्या डोसमुळे या वर्षीच्या डिसेंबरपर्यंतच सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण होणार आहे.”

    ते पुढे असंही म्हणाले की, भारताने आत्तापर्यंत २० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. जगभरात भारत लसीकरणाच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.