ashvini vaishnav travelling from train

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव(Ashwini Vaishnav) गुरुवारी भुवनेश्वर येथे ‘जन आशीर्वाद यात्रा’(Jan Ashirwad yatra) सुरू करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी भुवनेश्वर ते रायगडा ट्रेनमध्ये(Bhubaneshwar To Raygada Train) प्रवास केला. अचानक ट्रेनमध्ये रेल्वेमंत्री आले हे बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

    केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव(Railway Minister Ashwini Waishnav) यांनी प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी चक्क रेल्वेने प्रवास केला.प्रवास करताना त्यांनी प्रवाशांसोबत गप्पा मारल्या आणि रेल्वे सेवांबद्दल(Railway Minister Traveled from train) लोकांना काय वाटते(Railway passengers Feedback) ते जाणून घेतले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेल्वे आणि देशातील विकासाबद्दलच्या दृष्टिकोनाबद्दल त्यांनी लोकांना माहिती दिली. रेल्वे मंत्री गुरुवारी भुवनेश्वर येथे ‘जन आशीर्वाद यात्रा’(Jan Ashirwad yatra) सुरू करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी भुवनेश्वर ते रायगडा ट्रेनमध्ये(Bhubaneshwar To Raygada Train) प्रवास केला. अचानक ट्रेनमध्ये रेल्वेमंत्री आले हे बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

    भुवनेश्वरहून रायगडाच्या दिशेने रात्री प्रवास करताना त्यांनी प्रवाशांचा अभिप्राय जाणून घेतला. तसेच रेल्वेमधील स्वच्छतेबद्दल लोकांचे फिडबॅक जाणून घेतले.  ट्रेनमधील सुविधांबद्दल त्यांनी लोकांना अनेक प्रश्न विचारले. प्रवाशांना ट्रेनचा प्रवास आरामदायी आहे का हेसुद्धा जाणून घेतले. तसेच रेल्वेतील तरुणांशी संवाद साधून त्यांचा ‘नवीन भारता’विषयीचा दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

    दरम्यान, लोकांकडून फिडबॅक घेण्याबद्दल वैष्णव म्हणाले की “ही एक वेगळी भावना आहे. तुम्ही एखाद्या मिशनवर असताना भारताची लाइफलाइन असलेल्या रेल्वेत प्रवास करणं हा वेगळा अनुभव आहे. हा प्रवास आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देतो. रेल्वेमंत्री म्हणून मी स्वतः हा फिडबॅक घेणं आवश्यक आहे. रेल्वे आधीपेक्षा जास्त स्वच्छ असतात, त्यामुळे प्रवास करण्याचा आनंद वाढतो.”