‘प्रत्येक घरात रेशन’ योजना स्थगितीचे दिले निर्देश ; केंद्राचा केजरीवाल सरकारला झटका

दिल्ली सरकारच्या या डोअर स्टेप डिलिव्हरी योजनेवर केंद्र सरकारनं स्थगिती आणली आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारनं दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारला मोठा झटका दिला आहे.

    दिल्ली आम आदमी सरकारकडून ‘मुख्यमंत्री – प्रत्येक घरात रेशन’ ही योजना सुरू करण्यात येणार होती. येत्या २५ मार्चपासून ही योजना दिल्लीत सुरू होणार होती. परंतु दिल्ली सरकारच्या या डोअर स्टेप डिलिव्हरी योजनेवर केंद्र सरकारनं स्थगिती आणली आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारनं दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारला मोठा झटका दिला आहे.

    केंद्र सरकारनं दिल्ली सरकारच्या अन्न पुरवठा विभागाच्या सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. तसंच ही योजना सुरू न करण्याचे निर्देश दिले आहेत. केजरीवाल सरकारनं यासाठी निविदाही काढली होती. तसंच ही योजना २५ मार्चपासून सुरू करण्यात येणार होती. केंद्राच्या या निर्णयानंतर मोदी सरकार रेश माफियांना संपवण्याच्या विरोधात का आहे? असा सवाल दिल्ली सरकारनं केला आहे.