उत्तराखंडमध्ये भाजपा नेतृत्वात केले बदल ; मदन कौशिक नवे प्रदेशाध्यक्ष

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हा निर्णय घेतला असून, तो त्वरित लागू करण्यात येणार असल्याचे या नोटीसमध्ये म्हणण्यात आले आहे. कौशिक यांनी दिल्लीमध्ये नड्डा आणि दुष्यंत गौतम यांची भेट घेतली होती.

    दिल्ली : उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर भाजपाने आता प्रदेशाध्यक्षही बदलले आहेत. बन्सीधर भगत यांच्याऐवजी आता प्रदेशाध्यक्षपदाची धुरा मदन कौशिक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कौशिक हे त्रिवेंद्र सिंह रावत सरकारमधील एक मंत्री आहेत. भाजपाने जारी केलेल्या एका नोटीसमध्ये याबाबत माहिती देण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हा निर्णय घेतला असून, तो त्वरित लागू करण्यात येणार असल्याचे या नोटीसमध्ये म्हणण्यात आले आहे. कौशिक यांनी दिल्लीमध्ये नड्डा आणि दुष्यंत गौतम यांची भेट घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. कौशिक हे हरिद्वार मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. भुवन सिंह खंदुरी आणि रमेश पोखरियाल यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषवले आहे. सध्या ते त्रिवेंद्र सिंह रावत सरकारमध्येही मंत्रीपदावर आहेत.