char dham yatra

उत्तराखंड सरकारने(Uttarakhand Government) चार धाम यात्रा(Char Dham Pilgrimage) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सरकारचे प्रवक्ते सुबोध उनियाल यांनी ही माहिती दिली. 

    देशात अनेक राज्यांमध्ये अनलॉक(Unlock) प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.अनेक ठिकाणी परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. अशातच उत्तराखंड सरकारने(Uttarakhand Government) चार धाम यात्रा(Char Dham Pilgrimage) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सरकारचे प्रवक्ते सुबोध उनियाल यांनी ही माहिती दिली.राज्यात २२ जूनपर्यंत कर्फ्यू आहे.

    उनियाल म्हणाले की, कर्फ्यू कालावधीत जुन्या प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) काही बदलांसह कायम राहतील. ज्या जिल्ह्यात चारधाम आहेत. त्या जिल्ह्यातील रहिवाशांना निगेटिव्ह आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवालासह मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

    “आरटीपीसीआरच्या निगेटिव्ह अहवालामुळे चमोली जिल्ह्यातील रहिवासी बद्रीनाथ धाम, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ आणि उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दर्शन घेतील. लग्नात आणि अंत्यसंस्कारात येणाऱ्या लोकांची संख्या २० वरून ५० करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवाल अनिवार्य आहे”, अशी माहिती उनियाल यांनी दिली.

    सुबोध उनियाल म्हणाले, आठवड्यात पाच दिवस मिठाईचे दुकानेसुद्धा खुले राहतील. दुकानदारांनी मिठाई खराब होत असल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला. कर्फ्यू कालावधीत टेंपो आणि ऑटो सूरु राहतील. महसूलची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी २० जणांच्या मर्यादित संख्येत महसूल न्यायालये सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.