छत्तीसगडच्या भाजप नेत्याने मित्राच्याच पत्नीला दिली सेक्सची ऑफर, संतप्त महिलेने केली नेत्याची चपलेने धुलाइ

  छत्तीसगडमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला भाजपचे नगरसेवक सूर्यकांत ताम्रकर यांना चपलेने मारहाण करताना दिसत आहे.

  प्रकरण छत्तीसगडच्या बालोदा बाजार जिल्ह्यातील आहे. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, नगरसेवक सूर्यकांत ताम्रकर सुमारे दोन आठवड्यांपूर्वी एका मित्राच्या घरी गेले होते. तेथे त्याने एका मित्राच्या पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर दिल्याचा आरोप आहे. त्या नगरसेवकाने सांगितले की, आजकाल ‘देवर भाभी’ यांच्यात या सर्व गोष्टी चालतात. हे ऐकल्यावर महिलेला राग आला आणि तिने नगरसेवकाला चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली.

  15 दिवसांनंतर नगरसेवकाने केली संबंधीत महिलेला मारहाण

  या घटनेनंतर सुमारे 15 दिवसांनी आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये भाजपचे नगरसेवक सूर्यकांत तामरकर आणि त्यांचा एक सहकारी महिलेला मारहाण करताना दिसत आहे. महिलेने मारहाण केल्यानंतर देखील नगरसेवकाने तिला पुन्हा संदेश पाठवून संबंध ठेवण्याची ऑफर दिली.

  सोमवार 23 ऑगस्ट रोजी नगरसेवक तिच्या मित्राच्या दुकानात उपस्थित होता. ती महिला एका मैत्रीणीसह काठी घेऊन तिथे पोहोचली. त्यांनी नगरसेवकाला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नगरसेवक व त्याच्या मित्राने महिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या महिलांचे केस पकडून ओढूत नेत त्यांना वाईट रीतीने मारहाण केली. संतापाची गोष्ट म्हणजे महिलांना मारहाण होत असताना त्यांच्या मदतीला कोणी आले नाही. लोक गर्दीत उभे होते. मोबाईल वरून व्हिडिओ बनवत होते.

  पोलिसांनी नगरसेवकाला घेतलं ताब्यात

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने दिलेल्या तक्रारिरीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी नगरसेवकाच्या मित्राला अटक केली असून भाजपचा नगरसेवक अद्याप फरार आहे.