चिनी ड्रॅगन गारठले, सोसेना गारवा, १० हजार चिनी सैनिक माघारी

लडाखमध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे. थंडीचा कहर चिनी सैनिकांना सहन होत नाही. त्यामुळे या थंडीचा सामना करु न शकलेले सैनिक चीनला परत माघारी बोलवावे लागले आहेत. भारतीय हद्दीला लागून असलेल्या चीनच्या पारंपरिक प्रशिक्षण भागातून हे सैन्य मागे घेण्यात आलंय.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरची (Line of Actual Control) थंडी चीनी सैनिकांना बिलकूल सहन होत नसल्याचे चित्र आहे. भारताच्या सीमेवरून चीनने आपले दहा हजार सैनिक मागे घेतलेत. भारतीय हद्दीपासून तब्बल दोनशे किलोमीटर अंतर हे सैनिक मागे गेलेत.

लडाखमध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे. थंडीचा कहर चिनी सैनिकांना सहन होत नाही. त्यामुळे या थंडीचा सामना करु न शकलेले सैनिक चीनला परत माघारी बोलवावे लागले आहेत. भारतीय हद्दीला लागून असलेल्या चीनच्या पारंपरिक प्रशिक्षण भागातून हे सैन्य मागे घेण्यात आलंय.

गेल्या वर्षी मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात चीननं सीमेवरची आपली कुमक वाढवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. भारतीय जवानांना वर्षानुवर्ष या भागात पहारा देण्याची सवय असल्यामुळे थंडीचा सामना करण्याचा सराव भारतीय जवानांना आहे. मात्र चिनी सैनिकांना याची सवय नसल्यामुळे कडाक्याच्या थंडीचा ते सामना करू शकत नाहीत. त्यामुळे वाढत्या कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर चीनला आपले सैनिक मागे घ्यावे लागले.

यापूर्वीदेखील चीनने सैनिकांना ठराविक काळ सीमेवर ठेऊन लगेच माघारी बोलवण्याची भूमिका घेतलेली दिसली. पेंगाँग त्सो भागात चीननं वेगवेगळ्या ठिकाणी आपले एकूण ५०  हजार सैनिक तैनात केले होते. मात्र थंडीचा सामना करू न शकल्यामुळे या सैनिकांना मागे बोलवण्यात आलंय.

या भागात वजा १०  अंश सेल्सिअस तापमान आहे. या तापमानात भारतीय सैनिकांनी आपल्या पहारा कायम ठेवलाय. मात्र अशा प्रकारे तग धरणे चिनी सैनिकांना अशक्य झाले आहे. त्यामुळे चीनला दहा हजार सैनिक मागे घ्यावे लागले. विस्तारवादी चीन अखेर निसर्गाच्या रौद्र रूपासमोर शरण येताना दिसतोय. भारतीय सैनिकांचा निर्धार या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालाय.