चीनने लडाखच्या दिशेने तैनात केली H-6 बॉम्बर विमाने

  • काशगर एअर बेस पूर्व लडाखमधील पँगाँग लेकपासून ६९० किलोमीटर अंतरावर आहे. परंतु या पँगाँग टीएसओ क्षेत्रातून चिनी सैन्य अजूनही पूर्णपणे मागे हटलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, काशगर एअर बेसवर सहा शियान H-6 बॉम्बर विमाने चीनने तैनात केली आहेत. तसेच दोन विमानांमध्ये पेलोड म्हणजे शस्त्रसज्ज आहेत.

नवी दिल्ली – चिनी सैन्याने पूर्व लडाखमध्ये घुसखोरी केलेल्या भागातून पूर्णपणे माघार घ्यावी, यासाठी काल मोल्डोमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये कमांडर स्तरची पाचव्या फेरीची बैठक झाली. त्याचवेळी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एअर फोर्सने काशगर एअर बेसवर H-6 बॉम्बर विमाने तैनात केल्याचे उपग्रह फोटोंवरुन समोर आले आहे.   

काशगर एअर बेस पूर्व लडाखमधील पँगाँग लेकपासून ६९० किलोमीटर अंतरावर आहे. परंतु या पँगाँग टीएसओ क्षेत्रातून चिनी सैन्य अजूनही पूर्णपणे मागे हटलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, काशगर एअर बेसवर सहा शियान H-6 बॉम्बर विमाने चीनने तैनात केली आहेत. तसेच दोन विमानांमध्ये पेलोड म्हणजे शस्त्रसज्ज आहेत. 

H-6 बॉम्बर ही विमाने अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम आहेत. तसेच लडाखपासून ६०० किमी अंतरावर हा विमानतळ आहे. सहा हजार किलोमीटर हा H-6 विमानांचा पल्ला आहे. त्याशिवाय १२ शियान JH-7 फायटर बॉम्बर आणि चार J11 / 16 फायटर विमाने तैनात केली आहेत. H-6J विमाने YJ-12 जहाजविरोधी क्रूझ मिसाइल वाहून नेण्यास सक्षम आहे.