चीनमुळे इतर देशाचे हिंद महासागराकडील लक्ष वाढले- बिपीन रावत

बाहेरील अनेक देश हिंद महासागरमधून समुद्री मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे करून ते आपला प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र इतर देशाची स्पर्धा वाढल्यास आपल्याला सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो.

भारत आपल्या सागरी सीमेच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करत आहे. हिंद महासागरावर त्याचा विशेष डोळा आहे. अलिकडच्या काही वर्षांत चीनची अर्थव्यवस्था आणि लष्करी सामर्थ्य वाढल्याने या प्रदेशात आपले वर्चस्वही वाढविले आहे. चीनमुळे हिंद महासागरातील इतर देशांचीही आवड वाढली आहे. सध्या वेगवेगळ्या मोहिमांच्या समर्थनार्थ बाह्य सैन्याच्या १२० युद्धनौका येथे तैनात असल्याची माहिती ‘ग्लोबल डायलॉग सिक्युरिटी समिट ‘ येथे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी माहिती दिली आहे.

हिंदी महासागरात मामुली वादविवाद हित राहतात,मात्र सद्यस्थितीला येथे शांतता कायम आहे. अनेक देशांचे येथून आर्थिक फायदा कमावण्याचे उद्दिष्ट आहे. ते समुद्रमार्गे कनेक्टीव्हीटी वाढवत व्यापाराला चालना देऊ पाहत आहेत.

बाहेरील अनेक देश हिंद महासागरमधून समुद्री मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे करून ते आपला प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र इतर देशाची स्पर्धा वाढल्यास आपल्याला सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो. या क्षेत्रात शांती व सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी येथे पकड मजबूत करणे आवश्यकी असल्याचे मत रावत यांनी व्यक्त केले आहे.