सैन्यशक्तीत चीन पहिल्या क्रमांकावर तर भारत जगात दुसरा; जाणून घ्या पहिल्या दहा क्रमांकात कोणते देश आहेत

बल फायरपॉवर अहवालानुसार, भारतीय वायूदलाकडे एकूण 2123 विमाने आहेत. यापैकी 538 लढाऊ, 172 हल्ला करणारे, 250 वाहतूक, 359 प्रशिक्षण, 77 विशेष मोहिमेसाठी वापरल्या जाणारी विमाने आहेत. याचबरोबर, भारतीय वायू दलाकडे सध्या 722 हेलिकॉप्टर आहेत.

सैन्यशक्तिच्या बाबतीत पहिले 10 देश

चीन 2,183,000
भारत 1,444,000

अमेरिका 1,400,000
उ. कोरिया 1,280,000

रशिया 1,013,628
पाकिस्तान 6,54,000

द. कोरिया 5,80,000
इराण 5,23,000

व्हिएतनाम 4,82,000
सौदी अरब 4,78,000

सर्वात कमी सैन्य असलेले 10 देश

सुरीनाम 1,850
मोंटेनेग्रो 2,000

लायबेरिया 2,100
गॅबॉन 5,000

माल्डोवा 5,100
लातविया 5,300

नायजर 5,300
एस्तोनिया 6,500

भूटान 7,000
सेंट्रल अफ्रीकन रिपब्लिक 7,150

दिल्ली. सैन्यशक्तीच्याबाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश असल्याचा खुलासा ‘ग्लोबल फायरपॉवर रँकिंग 2020’च्या अहवालातून झाला आहे. चिनी लष्करात 21.83 लाख आणि भारताकडे एकूण 14.44 लाख जवान आहेत. यामुळे हे दोन्ही देश मिलिट्री मॅन पॉवरच्या दृष्टीने जगातील 2 सर्वात मोठे देश ठरले आहे. ग्लोबल फायरपॉवर रँकिंग 2020 या संस्थेकडून सैन्यशक्तीच्या बाबतीत जगातील देशांचे मानांकन जाहीर केले जाते. देशाची लष्करी ताकद (भूदल, नौदल आणि वायूदलाची युद्ध करण्याची क्षमता), मिलिट्री मॅनपॉवर, शस्त्रे, आर्थिक, नैसर्गिक संसाधने आणि भौगोलिक परिस्थितीच्या वेगवेगळ्या श्रेणी, या मानांकनातून जाहीर केल्या जातात.

सध्याचे मानांकन मिलिट्री मॅनपॉवरच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. देशासाठी कोणत्याही वेळी युद्धासाठी तयार राहणारे सैनिक या रँकिंगचे मुख्य आधार आहेत. 2019 मधील डेटाचा यासाठी आधार घेण्यात आला आहे. अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसेल तर अंदाजित आकडेवारीचा वापर या रँकिंगसाठी केला जातो. मिलिट्री मॅनपॉवरच्या आधारावर टॉप-10 देशांमध्ये चीन, भारतासह अमेरिका, उत्तर कोरिया, रशिया, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, इराण, व्हिएतनाम आणि सौदी अरेबियाचा समावेश आहे. या यादीत एकूण 138 देशांचे नाव आहे.

भारतीय वायू दलाचे सामर्थ्य

ग्लोबल फायरपॉवर अहवालानुसार, भारतीय वायूदलाकडे एकूण 2123 विमाने आहेत. यापैकी 538 लढाऊ, 172 हल्ला करणारे, 250 वाहतूक, 359 प्रशिक्षण, 77 विशेष मोहिमेसाठी वापरल्या जाणारी विमाने आहेत. याचबरोबर, भारतीय वायू दलाकडे सध्या 722 हेलिकॉप्टर आहेत.

भूदल आणि नौदल
भारतीय भूदलाकडे एकूण 4,292 टँक आहेत. याशिवाय, 8,686 शस्त्रसज्ज वाहने आणि 4,060 तोफा आहेत. रॉकेट प्रोजेक्टरची संख्या 266 सांगण्यात आली आहे. भारतीय नौदलाच्या बेड्यावर नजर टाकल्या, ग्लोबल फायरपॉवर रिपोर्टनुसार, आपल्याकडे एकूण 285 जहाजे आहेत. यात एक विमानवाहू नौका, 10 विध्वंसक नौका, 13 युद्धनौकांचा समावेश आहे. तर, 16 पाणपुड्या, 139 गस्ती नौकाही भारतीय नौदलाच्या बेड्यात सामील आहे. याशिवाय, 19 मोठे जहाज आणि 3 माईन वॉरफेयरही भारतीय नौदलाच्या दिमतीला आहे.

आशियातील देशांचाही समावेश

ग्लोबल फायरपॉवर लष्करी सामर्थ्याच्या दृष्टीने आशियातील देशांचाही या रँकिंगमध्ये समावेश करण्यात आला आहे. यात रशिया, चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया, तुर्की, इराण, पाकिस्तान, इंडोनेशिया, सौदी अरेबियांचा टॉप-10 देशांमध्ये समावेश आहे.