‘ब्रह्मपुत्रा’वर जगातील सर्वात मोठं धरण बांधण्यास चिनी संसदेची मंजुरी ; अरुणाचल प्रदेशाजवळील धरणामुळे  भारत आणि चीनमधील संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची चिन्हं

भारतातील अरुणाचलला लागून असलेल्या तिबेट प्रांतामध्ये चीन ब्रह्मपुत्रा नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी धरण बांधणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून भारत आणि चीनच्या पूर्व सीमेवर सुरु असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भारताला डिवचण्याच्या उद्देशानेच घेण्यात आल्याचे समजते. या निर्णयामुळे भारत आणि चीनमधील संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची चिन्हं दिसत आहेत.

    चीनच्या संसदेने ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. हे जगातील सर्वात मोठे धरण असणार आहे. मात्र भारतातला हे धरण धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे.याचे मुख कारण म्हणजे भारताच्या सीमेजवळ हा प्रकल्प उभारला जाणार आहे. भारतातील अरुणाचलला लागून असलेल्या तिबेट प्रांतामध्ये चीन ब्रह्मपुत्रा नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी धरण बांधणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून भारत आणि चीनच्या पूर्व सीमेवर सुरु असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भारताला डिवचण्याच्या उद्देशानेच घेण्यात आल्याचे समजते. या निर्णयामुळे भारत आणि चीनमधील संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची चिन्हं दिसत आहेत.

    चीन भारताच्या सीमेजवळ उभारतोय अनेक प्रकल्प
    चीन भारताला लागून असलेल्या सिमेवर मोठ्या जोमाने विकासकामं हाती घेताना दिसत आहे. याच विकास कामांअंतर्गत असणाऱ्या अनेक प्रकल्पांपैकी ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणाचा हा प्रकल्प आहे. चीनमध्ये ब्रम्हपुत्रा नदीला यारलुंग जांगबो असं म्हणतात. याच नदीवर भारतीय सीमेजवळ मोठं धरण बांधण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. हे धरण जगातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असणार आहे. सध्या जगातील सर्वात मोठं धरण असणाऱ्या थ्री जॉर्जच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या विजेच्या तीनपट अधिक जलविद्युत निर्मिती या धरणाचा माध्यमातून होणार आहे. या प्रकल्पामुळे ईशान्य भारतातील राज्यांबरोबरच बांगलादेशमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण करण्याचे समार्थ्य चीनला मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.