moderna vaccine

सिपलाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून मॉडर्नाच्या कोरोना लसी आयात(DCGI Gave Permission To Import Moderna Vaccine) करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. लवकरच याबाबत घोषणा करण्यात येणार आहे.

    भारताता आता आणखी एक लस(New Vaccine In India) उपलब्ध होणार आहे. आपत्कालीन वापरासाठी मुंबईतील औषधनिर्माण कंपनी सिपलाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून मॉडर्नाच्या कोरोना लसी आयात(DCGI Gave Permission To Import Moderna Vaccine) करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. लवकरच याबाबत घोषणा करण्यात येणार आहे. यापूर्वीच अमेरिकेने ‘कोवॅक्स’ च्या माध्यमातून भारताला मॉडर्ना लसी देणार असल्याचे मान्य केले होते. तसेच त्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) कडून मान्यता मागितली होती.

    अमेरिकेच्या फार्मा मेजरच्या वतीने सिप्लाने डीसीजीआयला या लसींच्या आयात व विपणन अधिकृततेसाठी विनंती केली होती. त्यानंतर आता डीसीजीआयने सिपला कंपनीला ही लस आयात करण्यासाठी मान्यता दिली आहे. भारतात लसीकरण मोहिमेअंतर्गत ऑक्सफर्डची कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुटनिक व्ही लस देण्यात येत आहे. आता मॉडर्ना लस भारतात आल्यानंतर नागरिकांना चौथा पर्याय उपलब्ध होणार आहे.

    कोविड -१९ पासून बचाव करण्यासाठी मॉडर्नाची लस आरएनए (एमआरएनए) वर अवलंबून आहे, जेणेकरून करोना व्हायरसविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी पेशी प्रोग्राम केल्या जाऊ शकतात. फायझर बरोबरच ही लस श्रीमंत देशांनी या लसीला पसंती दिली आहे. तज्ञांच्या मते, करोनाविरूद्ध ही लस ९० टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे.

    सुमारे १२० दशलक्ष अमेरिकन लोकांनी आतापर्यंत फायझर आणि मॉडर्नाचे डोस घेतले आहेत, त्यापैकी कोणालाही कोणतीही मोठी आरोग्य समस्या झाल्याचे समोर आलेलं नाही.