सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, १ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लातील क्रीरी भागातील सलोसमध्ये दहशतवादी लपल्याची सुरक्षा दलाला माहिती मिळाली होती. त्यामुळे या परिसराला घेराव घालून सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने शोध मोहिम सुरु केली होती. दहशतवाद्या सुरक्षा दलाने घेराव घातला असल्याचे समजताच सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरु केला. सुरक्षा दलाने दिलेल्या प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात जानेवारी २०२० पासून मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. भारतीय सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांना हद्दपार करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे दहशतवादीही सुरक्षा दल आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर गोळीबार करत आहेत. शनिवार (दि २२ ऑगस्ट२०२०) रोजी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सरक्षा दल आणि दहशतवाद्यामध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये १ दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. बारामुल्ला पोलीस, ५२ राष्ट्रीय रायफल आणि सीआरपीएफचे जवानांनी हाती घेतलेल्या शोध मोहिनेदरम्यान ही चकमक झाली. त्यामुळे पोलीसांनी नाकाबंदी करुन ही शोधमोहीम सुरु ठेवली आहे.

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लातील क्रीरी भागातील सलोसमध्ये दहशतवादी लपल्याची सुरक्षा दलाला माहिती मिळाली होती. त्यामुळे या परिसराला घेराव घालून सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने शोध मोहिम सुरु केली होती. दहशतवाद्या सुरक्षा दलाने घेराव घातला असल्याचे समजताच सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरु केला. सुरक्षा दलाने दिलेल्या प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. ठार केलेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.