army

दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या नौगांम भागात सैनिकांच्या पथकावर जोरदार गोळीबार सुरू केला. हल्ल्यानंतर जखमी सैनिकांना सैन्याच्या बेस रुग्णालयात नेण्यात आले. दहशतवाद्यांनी केलेल्या या भयानक कृत्यानंतर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरला (Shee nagar) दहशतवाद्यांनी (Terrorist) सीआरपीएफवर हल्ला केला. हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान जखमी झाले. जवळपास २ जवानांना वीरमरण आले. पम्पोर बायपासजवळ दहशतवाद्यांनी रोड ओपनिंग पार्टी (ROP) वर हल्ला केला.

प्राप्त माहितीनुसार दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या नौगांम भागात सैनिकांच्या पथकावर जोरदार गोळीबार सुरू केला. हल्ल्यानंतर जखमी सैनिकांना सैन्याच्या बेस रुग्णालयात नेण्यात आले.
दहशतवाद्यांनी केलेल्या या भयानक कृत्यानंतर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हल्लेखोरांच्या शोधात संपूर्ण भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.