पुलवामात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पुलवामा येथील मारवळ भागात अतिरेक्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराव कारवाई सुरू केली.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात मंगळवारी पहाटे सुरक्षा दले (security forces ) आणि अतिरेक्यांमधील चकमकीस (Clashes) प्रारंभ झाला. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पुलवामा येथील मारवळ भागात अतिरेक्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराव कारवाई सुरू केली.


ते म्हणाले की, यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा दलानेही प्रत्युत्तर दिले. अधिकारी म्हणाले की, अद्याप चकमकी चालू आहेत, सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे.