उत्तराखंडमध्ये पुन्हा ढगफुटी; चार जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने चार तहसिलमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी गढवाल भागाचे हवाई सर्वेक्षण केले होते. जिल्हाधिकारी आशीष चौहान यांनी युद्धपातळीवर मदतीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे मुनस्यारी येथे मालुपाती गावात पुन्हा भूस्खलन झाले. जवळपास 8 कुटुंब धोक्यात आहेत. चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आता थांबला आहे.

  पिथौरागड, उत्तराखंडच्या पिथौरागढमधील धारचुला तहसील, उत्तराखंडचा सीमावर्ती जिल्हा आणि नेपाळच्या गावात रविवारी रात्री एकाचवेळी ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

  धारचुला तहसीलपासून 12 किमी अंतरावर कैलास मानसरोवर यात्रेच्या मार्गाला लागून असलेल्या जुम्मा गावाचा संपर्क तुटला  असून सर्वाधिक नुकसान याच गावात झाले आहे. गावातील 9 जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. बचावकार्यात तीन मुलांसह एकूण चार मृतदेह सापडले आहेत. गावातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे.

  एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, महसूल दल घटनास्थळी पोहोचून बचावकार्य करत आहे. महामार्गासह सर्वपायवाट बंद केल्यामुळे गावात प्रवेश करणं कठीण झाले आहे.

  नद्यांचे रौद्र रूप
  ढग फुटीमुळे कालू नदी, कुलागाड आणि एलागाड नद्यांनी रौद्र रूप धारण केले. यामुळे जुम्मा गावातील चामी तोकमध्ये अनेक घराचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी आशीष चौहान यांनी युद्धपातळीवर मदतीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे मुनस्यारी येथे मालुपाती गावात पुन्हा भूस्खलन झाले. जवळपास 8 कुटुंब धोक्यात आहेत. चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आता थांबला आहे.

  चार तहसिलमध्ये जनजीवन विस्कळीत

  गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने चार तहसिलमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी गढवाल भागाचे हवाई सर्वेक्षण केले होते.