sweet shop

मुंबई : मिठाईच्या दुकानांमध्ये(sweet shops) ट्रेमध्ये पॅकिंगशिवाय(packing) ठेवलेली मिठाई तसेच दुधापासून बनविलेले पदार्थ यांच्या ट्रेसमोर त्या पदार्थाची एक्सपायरी डेट टाकणे आता बंधनकारक(expiry date compulsion) आहे. केंद्र सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाने १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

पॅकिंग न केलेला पदार्थ कधी बनविला आहे तसेच बनविल्यापासून तो किती दिवस खाण्यासाठी उपयुक्त आहे हे तो विकत घेणाऱ्या ग्राहकांना माहित नसते. शिळे पदार्थ, उघड्यावर ठेवलेली मिठाई खाल्ल्याने विषबाधा होण्याचे प्रकार काहीवेळा घडत असतात. मात्र १ ऑक्टोबरपासून अशा पदार्थांची विक्री करताना त्यासोबत एक्सपायरी डेट लिहिणे आता बंधनकारक असल्याने खराब पदार्थांची विक्री होणार नाही. या नियमाच्या अंमलबजावणी विषयीचे आदेश शुक्रवारी केंद्र सरकारच्या अन्न आणि पुरवठा विभागाने काढले आहेत.