राहुल गांधींनी ‘अब की बार मोदी सरकार’ या घोषवाक्याची उडवली खिल्ली

अबकी बार करोडो बेरोजगार, कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. त्याचबरोबर अबकी बार करोडो बेरोजगार’ यासाठी हॅशटॅग वापरला. राहुल गांधी यांनी ट्वीट केल्यानंतर कमेंट्स बॉक्समध्ये काँग्रेस आणि भाजपा पक्षातील कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

    कोरोना, जीएसटी, लॉकडाउन, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, अर्थव्यवस्था यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. केंद्र सरकारच्या ‘अब की बार मोदी सरकार’ या घोष वाक्याची त्यांनी खिल्ली उडवली आहे. मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.