काँग्रेसचा आमदार योगींवर लट्टू; म्हणाला मी त्यांची पूजा करतो

सोमनाथ भारती यांच्यावरील कारवाईसंदर्भात राकेश सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारला पाठिंबा दिला आहे.

लखनौ. काँग्रेसचे आमदार राकेश सिंह (Rakesh singh) यांनी आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावरील कारवाई योग्यच असल्याचे मत व्यक्त केले आहे. सोमनाथ भारती यांच्यावरील कारवाईसंदर्भात राकेश सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारला पाठिंबाही दिला. सोमनाथ भारती यांच्यावर रासुकानुसार कारवाई करीत देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांच्यावर स्तुतीसुमनेही उधळली. योगी आदित्यनाथ यांची पूजा करतो असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मी देवच मानतो. त्यांची रोज पूजाही करतो. योगी आदित्यनाथ यांच्यावर तर विरोधकही आरोप करू शकत नाही. योगींसोबत तुलना होऊ शकेल असा एकही व्यक्ती काँग्रेसमध्ये नाही.

राकेश सिंह, आमदार, काँग्रेस

 

– आपने कारवाई कारवाई करावी

आप आमदारासोबत जे घडले ते कमीच होते. त्यांची भाषाही अमर्यादित होती. कोणताही आमदार वा लोकप्रतिनिधीने अशा भाषेचा प्रयोग करणे अयोग्यच आहे. ज्या पक्षाचे ते आमदार आहेत त्या पक्षाने त्यांच्यावर कारवाई करायला हवी असे राकेश सिंह म्हणाले. योगी आदित्यनाथ जी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांची उत्तर प्रदेशात पूजा केली जाते. विरोधी पक्षातील आमदारदेखील त्यांच्यावर आरोप ठेवू शकत नाहीत किंवा अशी भाषा वापरु शकत नाहीत.