oscar fernandes

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस(Oscar Fernandes Passes Away) यांचं आज मंगळुरूमध्ये निधन झालं आहे. ते ८० वर्षाचे होते.

    नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस(Oscar Fernandes Passes Away) यांचं आज मंगळुरूमध्ये निधन झालं आहे. ते ८० वर्षाचे होते. जुलैमध्ये त्यांच्या डोक्याला मार लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधानावर सर्व पक्षांकडून शोक व्यक्त होत आहे.

    जुलै महिन्यात घरात योगा करत असताना ऑस्कर फर्नांडिस पडले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने मेंदूमध्ये रक्त जमा झाले होते. त्यांच्यावर एक सर्जरीही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

    फर्नांडिस यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरमय्या आणि डी. के. शिवकुमार त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यांच्यावर होत असलेल्या उपचाराची माहितीही त्यांनी घेतली होती.गांधी कुटुंबाच्या जवळचे फर्नांडिस यूपीए सरकारमध्ये केंद्रीय परिवहन मंत्री होते. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणूनही काम पाहिलं होतं. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष होते.