ममतांच्या हत्येचे रचले षडयंत्र ; तृणमूलच्या खासदारांचे निवडणूक आयुक्तांना निवेदन

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. अशा प्रकारच्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली. ममता बॅनर्जी यांच्या प्रकृतीबाबत मला चिंता आहे.

    कोलकाता : ममता बॅनर्जी यांच्यावर नंदिग्राममध्ये झालेला हल्ला नियोजित होता. त्यांची हत्या करण्यासाठी विरोधकांनी षडयंत्र रचले असून त्याचा तपास व्हाय हवा अशी मागणी करीत तृणमूल काँग्रेसच्या सहा खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. हल्ल्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी यावेळी काळया पट्टया डोक्याला बांधल्या होत्या.

    चौकशी करण्यासाठी भाजपाचे समर्थन

    तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन, राज्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य, पार्थ चटर्जी यांनी प्रकरणाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली. ममतांच्या हत्येचा कट होता, असा आरोप या नेत्यांनी केला. या घटनेनंतर राज्यातील निवडणुकीसंबंधीची चाल बदलल्याचे दिसून आले. कोलकाताच्या रुग्णालयात दाखल ममतांनी यादरम्यान समर्थकांसाठी एक व्हीडिओ संदेश जारी केला. शांतता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले. भाजपनेदेखील निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी गांभीर्याने चौकशी करण्याची मागणी केली. भाजप नेते सत्यपाल सिंह म्हणाले, पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांना विश्वास नसल्यास प्रकरण सीबीआयकडे सोपवावे.

    हल्ला प्रकरणी कारवाई करा: देवैगौडा

    कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. अशा प्रकारच्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली. ममता बॅनर्जी यांच्या प्रकृतीबाबत मला चिंता आहे. राजकारणामध्ये विजय-पराजय या साधारण गोष्टी असतात, मात्र लोकशाहीला अशा प्रकारच्या हिंसक घटनांमुळे धोका पोहोचतो. सर्वच बाजूंची इथून पुढे संयम पाळला जाईल अशी आशा आहे.