कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील ५००हून अधिक डॉक्टरांचा बळी, केवळ इतक्या डॉक्टरांनाच विम्याचा लाभ ?

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तब्बल ५१५ डॉक्टरांचा कोरोनामुळे बळी गेला. यातील २९२ डॉक्टर (Doctor) राज्यातील आहेत. कोरोना रुग्णांची सेवा करताना झालेल्या संसर्गामुळे (Corona infection) या डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती आयएमएने दिली.

देशात कोरोना विषाणूचे (Corona Virus) संकट दिवसागणिक वाढत आहे. परंतु यामध्ये अनेक कोरोना योद्धांचा बळी (death) देखील गेला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तब्बल ५१५ डॉक्टरांचा कोरोनामुळे बळी गेला. यातील २९२ डॉक्टर (Doctor) राज्यातील आहेत. कोरोना रुग्णांची सेवा करताना झालेल्या संसर्गामुळे (Corona infection) या डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती आयएमएने दिली.

देशभरातील १ हजार ७४६ शाखांमधून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांची आकडेवारी समोर आली. हे सर्व अॅलोपॅथी शाखेतील डॉक्टर आहेत. मात्र, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या डॉक्टरांची संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी व्यक्त केली. दुर्दैवी बाब म्हणजे यातील केवळ ६२ डॉक्टरांच्या कुटुंबीयांनाच सरकारने जाहीर केलेल्या विम्याचा लाभ मिळाला.

कोरोनामुळे जीव गमावलेल्या डॉक्टरांमध्ये २०१ डॉक्टर ६० ते ७० वयोगटातील आहेत. तर १७१ डॉक्टर्स ५० ते ६० वयोगटातील आहेत. सत्तरपेक्षा अधिक वय असणाऱ्या ६६ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३५ ते ५० वयोगटातील ५९ आणि ३५ पेक्षा कमी वय असणाऱ्या १८ डॉक्टरांना जीव गमवावा लागला. मात्र केंद्र सरकारकडे कोरोनामुळे जीव गमावलेल्या डॉक्टरांविषयी कोणताही डेटा नसल्याची माहिती डॉ. शर्मा यांनी दिली.