corona

दिल्ली: जगभरात कोरोबाधित(corona affected) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत चार कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा ११ लाख १५ हजारांवर पोहोचला आहे. आतापर्यंत ९९ लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमणातून बाहेर आले आहे. कोरोनाबाबत तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. सुरूवातीला हा आजार फक्त श्वसनासंबंधी आजार असल्याचे दिसून आले होते. कालांतराने मल्टीऑगर्न डिसीज असल्याचे निष्पन्न झाले. कारण कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा परिणाम फुफ्फुस, मेंदू, हृदय, लिव्हर, किडनी यांवर होत होता, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोना व्हायरसपासून बचावसाठी सण उत्सावानिमित्त कोणाच्याही घरी जाऊ नका. तसेच कोणलाही स्वतःच्या घरी बोलवू नका. कोणीही नातेवाईक घरी आल्यास त्याच्यात कोरोना किंवा इतर आजाराची लक्षणं दिसत आहेत की नाही, याची काळजी घ्या. सगळ्यात महत्वाचं सणांच्यावेळी खरेदी करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या महामारीचा ग्राफ खाली जाणं म्हणजेच देशात सर्वकाही व्यवस्थित सुरू आहे, असे अजिबात नाही. लोकांच्या लहानात लहान चुकांमुळे पुन्हा हा ग्राफ वर जाऊ शकतो. युरोपमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. फ्रान्समध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. या स्थितीपासून बचावासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.