घरात अन् ऑफिसमध्ये AC मुळं पसरतोय कोरोना, तुम्ही देखील घ्या ‘ही’ खबरदारी; अन्यथा…

एयरोसोल आणि ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचे सांगण्यात आले. नव्या गाईडलाईन्सनुसार व्हेंटिलेशन आणि मोकळ्या जागांना विशेष महत्व दिले आहे. कोरोना लसीकरण हे चांगले व्हेंटिलेटेड असलेल्या ठिकाणी करावे, असे सांगितले आहे.

  नवी दिल्ली (वृत्त संस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, वेळोवेळी नवनव्या गाईडलाईन्स जारी करण्यात येत आहेत. पण आता कोरोना विषाणूचा संसर्ग घर किंवा ऑफिसमधील एसीच्या माध्यमातून होत असल्याचे समोर आले आहे.

  एयरोसोल आणि ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचे सांगण्यात आले. नव्या गाईडलाईन्सनुसार व्हेंटिलेशन आणि मोकळ्या जागांना विशेष महत्व दिले आहे. कोरोना लसीकरण हे चांगले व्हेंटिलेटेड असलेल्या ठिकाणी करावे, असे सांगितले आहे. वैज्ञानिकांच्या मते ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून कोरोना विषाणू हवेत उपस्थित असतो तो दुसऱ्या व्यक्तींनाही संक्रमित करतो. जागतिक आरोग्य संघटना (WHO)नेही व्हेंटिलेशनची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले आहे.

  एक मीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावर पसरतो विषाणू

  WHO ने सांगितले की, कोरोना विषाणू मुख्यत: एकापासून दुसऱ्याकडे पसरतो. विशेष करून एक मीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावर असणाऱ्या व्यक्तीला बाधित करू शकतो. जर कोणतीही व्यक्ती ड्रॉपलेट्स आणि एयरोसोलच्या संपर्कात येत असेल तर ते डोळे, नाक आणि तोंडाच्या माध्यमातून संक्रमित होऊ शकतात.

  घरातील हवा महत्त्वाची

  घरातील हवा फक्त महामारीपासून लढण्यासाठी नाहीतर फ्लू किंवा कोणत्याही श्वसन संक्रमणाच्या प्रादुर्भावापासून रोखण्याचे काम करते. या आजारापासून वाचण्यासाठी व्हेंटिलेशन आणि फिल्ट्रेशन असणे गरजेचे आहे. आतील हवा शुद्ध आणि कीटाणूमुक्त असणे गरजेचे आहे.

  असे असावे घरात व्हेंटिलेशन

  पंखा अशा पद्धतीने लावावा ज्या प्रकारे दूषित हवा कोणत्याही प्रकारे बाहेर जाईल. किचनमध्ये एग्झॉस्ट फॅन लावणे गरजेचे आहे. जर खिडकी आणि दरवाजे बंद असतील तर एग्झॉस्ट फॅन सुरुच ठेवावा.

  ऑफिसमध्ये व्हेंटिलेशन

  खिडक्या आणि दरवाजांना बंद ठेवल्यानंतर AC सुरु केल्यानंतर संक्रमित हवा पूर्ण तेवढ्याच भागात पसरते. त्यामुळे एकापासून दुसऱ्याला संक्रमित करण्याचा धोका उद्भवू शकतो. खिडकी किंवा दार उघडेच ठेवावे जेणेकरून बाहेरची ताजी हवा आत येऊ शकेल.

  सेंट्रलाईज्ड AC असलेल्या ठिकाणचे व्हेंटिलेशन

  ज्या ठिकाणी AC चा वापर केला जातो. त्या ठिकाणी ऑफिस, ऑडिटोरियम, शॉपिंग मॉल्सवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. या फिल्टर्सच्या नियमितपणे साफसफाई करणे गरजेचे आहे.

  सार्वजनिक वाहतुकीत व्हेंटिलेशन

  पब्लिक ट्रान्सपोर्ट वाहनांमध्ये हवेचा क्रॉस फ्लो होणे गरजेचे आहे. बस आणि रेल्वेच्या खिडक्या उघड्या असाव्यात. AC असणाऱ्या बस किंवा रेल्वेमध्ये वायू प्रवाह सुरळीत राहावा यासाठी एग्झॉस्ट सिस्टिम सुरू करावी.

  Corona is spreading in the home and in the office due to AC you also take this precautions otherwise