कोरोनाचा उद्रेक, देशात २४ तासांत ६९ हजार ८७८ कोरोनाबाधितांची नोंद

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २९ लाख ७५ हजार ७०२ इतकी झाली आहे. तर ६ लाख ९७ हजार ३३० रूग्ण सध्या पॉझिटिव्ह आहेत. तर २२ लाख २२ हजार ५७८ रूग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ५५ हजार ७९४ कोरोना रूग्णांचा एकूण मृत्यू झाला आहे.

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या २४ तासांत देशात ६९ हजार ८७८ इतक्या नवीन कोरोनाबाधितांची विक्रमी नोंद करण्यात आली आहे.त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २९ लाखांच्या वर गेला आहे. मात्र मागील २४ तासांत ९४५ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा दर हा १.८९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २९ लाख ७५ हजार ७०२ इतकी झाली आहे. तर ६ लाख ९७ हजार ३३० रूग्ण सध्या पॉझिटिव्ह आहेत. तर २२ लाख २२ हजार ५७८ रूग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ५५ हजार ७९४ कोरोना रूग्णांचा एकूण मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी म्हटले की, दोन वर्षापेक्षा कमी कालावधीत जगातून कोरोनाचं संकट संपलेलं असेल. सन १९१८ मधील स्पॅनिश फ्लूपेक्षा हा वेग जास्त आहे.

दरम्यान, काल शुक्रवारी देशाच्या कोरोनामुक्तीचा दर ७४ टक्क्यांवर पोहोचला होता. तसेच दिवसभरात ६२,२८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशासह अनेक राज्यांत सुद्धा कोरोनाचा कहर होत आहे. परंतु राज्यातील काही भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे.