देशात कोरोनाचा कहर, गेल्या २४ तासांत ६१ हजार ५३७ नवे कोरोनाबाधित रूग्ण

  • आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख ८८ हजार ६१२ इतकी झाली आहे. ६ लाख १९ हजार ८८ इतके पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. देशात आतापर्यंत १४ लाख २७ हजार ६ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ४२ हजार ५१८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ६१ हजार ५३७  नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९३३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख ८८ हजार ६१२ इतकी झाली आहे. ६ लाख १९ हजार ८८ इतके पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. देशात आतापर्यंत १४ लाख २७ हजार ६ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ४२ हजार ५१८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.   

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी देशात ५ लाख ९८ हजार ७७८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. काल पर्यंत म्हणजेच ७ ऑगस्ट पर्यंत देशात २ कोटी ३३ लाख ८७ हजार १७१ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. अमेरिका आणि ब्राझीलमध्येही कोरोना रूग्णांच्या संख्यात अधिकपटीने वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

अमेरिकेत ३ लाखांच्या वर आणि ब्राझिलमध्येही २ लाखांच्या वर नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांमध्येच भारत कोरोनाबाधितांच्या सर्वाधिक रुग्णसंख्येमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच देशात कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.३२ टक्के इतके आहे