देशात कोरोनाचा उद्रेक, गेल्या २४ तासांत ६७ हजार १५१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ३२ लाख ३४ हजार ४७५ एकूण कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत तब्बल ५९ हजार ४४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच देशात ७ लाख ७ हजार २६७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सक्रिय आहेत. त्याचप्रमाणे २४ लाख ६७ हजार ७५९ कोरोना रूग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशात कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. ( corona patient increased ) गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल ६७ हजार १५१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात १ हजार ५९ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३२ लाखांच्याही ( crosses 32 lakh mark) पार गेला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ३२ लाख ३४ हजार ४७५ एकूण कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत तब्बल ५९ हजार ४४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच देशात ७ लाख ७ हजार २६७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सक्रिय आहेत. त्याचप्रमाणे २४ लाख ६७ हजार ७५९ कोरोना रूग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, देशात काल मंगळवारी ६० हजार ९७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर ८४८ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. परंतु आजच्या आकडेवारीनुसार कोरोना रूग्णांच्या मृतांचा आकडा १ हजारांच्या वर गेला आहे. सध्या देशात अनलॉक – ३ लागू असून येत्या १ सप्टेंबरपासून ‘अनलॉक- ४’च्या प्रक्रियेला सुरूवात होण्याची शक्यता आहे. देशातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी टप्प्याने अनलॉक केले जात आहे. मात्र, असे असताना कोरोनाबाधितांचा सातत्याने वाढता आकडा ही चिंताजनक बाब आहे. देशात कोरोना चाचणीची संख्या वाढल्यामुळे रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे.