देशात कोरोनाचा उद्रेक! मागील २४ तासांत ५७ हजार ११७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

  • आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाख ९५ हजार ९८८ इतकी झाली आहे. तर सध्या ५ लाख ६५ हजार १०३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे १० लाख ९४ हजार ३७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु ३६ हजार ५११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत रूग्णांची संख्या १७ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. तसेच मागील २४ तासांत ५७ हजार ११७ इतक्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७६४ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाख ९५ हजार ९८८ इतकी झाली आहे. तर सध्या ५ लाख ६५ हजार १०३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे १० लाख ९४ हजार ३७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु ३६ हजार ५११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

जुलै महिन्यात भारतामध्ये ११.१ लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १९ हजार १२२ जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार ३० जूनपर्यंत देशात ५ लाख ६६ हजार ८४० इतकी कोरोना रुग्णांची संख्या होती. परंतु आता जुलै महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत २.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. 

दरम्यान, देशभरात कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत पुन्हा एकदा नव्याने भर झालेली पाहायला मिळत आहे. देशात काल शुक्रवारी ५५ हजार ७९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाखांच्या वर गेली होती. परंतु आता चिंताजनक म्हणजे गेल्या २४ तासांत कोरोना रूग्णांची संख्या १७ लाखांच्या जवळ पोहोचली आहे.