देशात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट मात्र मृतांच्या संख्येने वाढली चिंता

गेल्या २४ तासांत देशामध्ये १ लाख ३२ हजार ७८८ नव्या कोरोनाबाधितांची(Corona Patients in India) नोंद झाली आहे.  देशभरात ३२०७ कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

    गेल्या २४ तासांत देशामध्ये १ लाख ३२ हजार ७८८ नव्या कोरोनाबाधितांची(Corona Patients in India) नोंद झाली आहे.  देशभरात ३२०७ कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिवसभरात २ लाख ३१ हजार ४५६ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. याआधी सोमवारी १ लाख २७ हजार ५१० कोरोनाबाधितांची नोंद झाली होती तर २७९५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. सलग विसाव्या दिवशी नव्या रोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

    देशातील पाच राज्यांपैकी तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत तामिळनाडूमध्ये २६,५१३, केरळमध्ये १९,७६०, कर्नाटकमध्ये १४,३०४, महाराष्ट्रात १४,१२३ तर आंध्र प्रदेशात ११,३०३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

    देशभरात आतापर्यंत २ कोटी ८३ लाख ७ हजार ८३२ जणांना करोनाची लागण झाली आहे. २ कोटी ६१ लाख ७९ हजार ८५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर देशात आतापर्यंत ३ लाख ३५ हजार १०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १७ लाख ९३ हजार ६४५ सक्रिय रुग्ण आहेत. तर २१ कोटी ८५ लाख ४६ हजार ६६७ जणांनी करोनावरील लस घेतली आहे.