कोरोनाचे थैमान सुरुच, देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने गाठला साडेतीन महिन्यातील उच्चांक

देशात कोरोना रुग्णांची(Corona patients in India) संख्या रोज वाढताना दिसत आहे. शुक्रवारी तर कोरोना रुग्णसंख्येने ११० दिवसांमधील उच्चांक गाठला आहे.

    नवी दिल्ली: देशात कोरोना रुग्णांची(Corona patients in India) संख्या रोज वाढताना दिसत आहे. शुक्रवारी तर कोरोना रुग्णसंख्येने ११० दिवसांमधील उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी देशात ३९,७२६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.तसेच १५४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    याआधी २९ नोव्हेंबरला देशात ४१,८१० कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. यानंतर हा आकडा खाली आला होता. मात्र, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे.

    शुक्रवारच्या कोरोना रुग्णसंख्येचा आकडा पाहाता कोरोनाचा विस्फोट होतोय का? असा प्रश्न निर्माण होतो. यात दिलासादायक बाब म्हणजे मृत्यूदर कमी राखण्यात भारताला यश आलं आहे. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.३८ टक्के इतका आहे.

    महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. राज्यात शुक्रवारी २५,६८१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४,२२,०२१ झाली आहे. शुक्रवारी १४,४०० रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण २१,८९,९६५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.४२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात सध्या एकूण १,७७,५६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.