देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट मात्र केरळमधील स्थिती भयावह – जाणून घ्या आकडेवारी

गेल्या २४ तासांमध्ये देशात ३० हजार ९४१ नव्या रुग्णांची(Corona patients In India) नोंद झाली होती.यामध्ये केरळमध्येच(Keral) १९,६२२ म्हणजे साधारण दोन तृतीयांश नवे रुग्ण सापडले आहेत.

    नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांमध्ये कालच्या तुलनेत नव्या कोरोनाबाधितांच्या(Corona patients) संख्येत १२ हजारांनी घट झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ३० हजार ९४१ नव्या रुग्णांची नोंद झाली होती.यामध्ये केरळमध्येच(Keral) १९,६२२ म्हणजे साधारण दोन तृतीयांश नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच केरळ राज्यामध्ये १३२ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कालच्या दिवसात देशात ३५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Death By Corona)झाला आहे.

    गेल्या २४ तासात भारतात ३० हजार ९४१ नवे कोरोनाबाधित आढळले. तसेच ३५० रुग्णांचा मृत्यू झाला. कालच्या दिवसात देशात ३६ हजार २७५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

    भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी २७ लाख २२ हजार १२१ इतका आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी १९ लाख ५९ हजार ६८० रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ लाख ३८ हजार ५६० रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. ३ लाख ७० हजार ६४० इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.