प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

जगात अमेरिकेनंतर भारतात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक आहेत. साधारण वर्षभरापासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने पाहता पाहता भारतालाही विळखा घातला आहे. दरम्यान, आता या रुग्णसंख्येने तब्बल १ कोटींचा आकडा ओलांडला आहे. याविषयीची माहिती एका वृत्तसंस्थेने दिला आहे. मागील 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 25,153 नवे रुग्ण आढळून आले. नव्याने कोरोनाची लागण होणाऱ्यांचा आकडा देशात काही अंशी कमी होताना दिसत आहे. पण, वैश्विक पातळीवर भारतातील एकूण कोरोबाधितांचा आकडा मात्र लक्ष वेधणारा ठरत आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाची लागण झाल्यामुळं 1. 45 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिल्ली (Delhi).  जगात अमेरिकेनंतर भारतात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक आहेत. साधारण वर्षभरापासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने पाहता पाहता भारतालाही विळखा घातला आहे. दरम्यान, आता या रुग्णसंख्येने तब्बल १ कोटींचा आकडा ओलांडला आहे. याविषयीची माहिती एका वृत्तसंस्थेने दिला आहे. मागील 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 25,153 नवे रुग्ण आढळून आले. नव्याने कोरोनाची लागण होणाऱ्यांचा आकडा देशात काही अंशी कमी होताना दिसत आहे. पण, वैश्विक पातळीवर भारतातील एकूण कोरोबाधितांचा आकडा मात्र लक्ष वेधणारा ठरत आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाची लागण झाल्यामुळं 1. 45 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची लागण होऊन कोरोनामुक्‍त होणाऱ्यांचा आकडा 95,50,712 वर पोहोचला आहे. तर, देशात सध्याच्या घडीला 3,08,751 कोरोनाबाधित रुग्णांवर विविध पद्धतींनी उपचार सुरु आहेत. अमेरिके पाठोपाठ भारत एक कोटी कोरोना रुग्णांचा आक़डा ओलांडणारा दुसरा देश ठरला आहे. कोविड -19 चा संसर्ग होणाऱ्या रुग्णांच्या रिकव्हरी रेटचे प्रमाण 95.46 टक्‍क्‍यांवर पोहोचले आहे. या तुलनेने देशात सक्रिय रुग्णांची संख्या कमी असल्याचे लक्षात येत आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही देशात तुलनेने कमी आहे. त्यामुळे काही अंशी देशाला या कोरोनाच्या विळख्यातून दिलासा मिळत असल्याची चिन्हं आहेत. पण, अनेक ठिकाणी नागरिकांचा हलगर्जीपणा आणि त्यामुळं पुन्हाचा संसर्ग होण्याचे संकट काही टळलेले नाही ही बाबही तितकीच महत्त्वाची.

दरम्यान, स्वदेशी आणि परदेशी बनावटीच्या लसींना देशात अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर तातडडीने लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध स्तरावर तयारी केली जात असून, देशातील नागरिकांना कोरोनामुक्तीच्या दिशेनं सरकार सक्रिय असल्याचं स्पष्ट होत आहे. तेव्हा आता कोरोना लसीला केंद्राची अधिकृत परवानगी मिळून नेमके हे लसीकरण केव्हा सुरू होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.