तिसरी लाट केरळमधून? केरळमध्ये सलग चौथ्या दिवशी २० हजारांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण

देशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ४४ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले तर ५५५ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला. दररोज रुग्णांची संख्या वाढत असून त्यातील निम्मे रुग्ण एकट्या केरळमधील आहेत. आता ईशान्येकडील पाच राज्यांतही कोरोना संसर्ग वाढत आहे. भारतात तिसरी लाट अद्याप आलेली नाही, मात्र ती केरळमधून येईल, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

    कोरोना COVID-19 पुन्हा डोके वर काढत आहे. जगात तिसरी लाट आली आहे. तसे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. सुरुवातीला १४४ देशांत ही लाट आल्याचे सांगण्यात आले. डेल्टा व्हेरियंट हा तिसऱ्या लाटेचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले. आता भारतात दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा कोरोना डोके वर काढत असल्याचे दिसत आहे. केरळमध्ये Kerala परिस्थिती अनियंत्रित होत चालली आहे. सलग चौथ्या दिवशी २०  हजारांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

    देशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ४४ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले तर ५५५ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला. दररोज रुग्णांची संख्या वाढत असून त्यातील निम्मे रुग्ण एकट्या केरळमधील आहेत. आता ईशान्येकडील पाच राज्यांतही कोरोना संसर्ग वाढत आहे. भारतात तिसरी लाट अद्याप आलेली नाही, मात्र ती केरळमधून येईल, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

    केरळ राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६ हजार ७०१ झाली आहे. केरळ सरकारने सांगितले की, गेल्या २४ तासांमध्ये राज्यात १ लाख ५२ हजार ६३९ लोकांचे कोरोना नमुने घेण्यात आले. यासह, राज्यातील एकूण तपासणीची आकडेवारी आता २ कोटी ७० लाख ४९ हजार ४३१ झाली आहे.

    कोरोना साथीला आवर घालण्यासाठी केरळने केलेले प्रयत्न जगभरात नावाजले गेले होते. पण आता त्याच केरळमध्ये पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र तेथील मृत्युदर कमी आहे. गेल्या चार आठवड्यांपासून देशातील २२ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून त्यात केरळमधील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. देशात केरळमध्ये अँटिबॉडीज तसेच सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. चौथ्या सिरो सर्वेक्षणात हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.