Corona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश

आयजीआयएमएस रुग्णालयात एक ६० वर्षीय रुग्णावर शस्त्र क्रिया करून तब्ब्ल क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात आला आहे. ही शस्त्रक्रिया ३ तास चालली. हा चेंडू एवढा ब्लॅक फंगस काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे.

    पाटणा : कोरोनानंतर आता ब्लॅक फंगसने सर्वत्र ब्लॅक फंगसबद्दल चर्चा होत आहे. सध्या सगळीकडे ब्लॅक फंगसचे रुग्णामध्ये वाढ होताना दिसून येते. अशा परिस्थितीत बिहार मध्ये घडलेली घटना धक्कादायक आहे.

    बिहारची राजधानी पाटणा येथे हा घडलेला प्रकार आहे. येथील आयजीआयएमएस रुग्णालयात एक ६० वर्षीय रुग्णावर शस्त्र क्रिया करून तब्ब्ल क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात आला आहे. ही शस्त्रक्रिया ३ तास चालली. हा चेंडू एवढा ब्लॅक फंगस काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे.

    शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांच्या टीमच्या म्हणण्यानुसार ही शस्त्रक्रिया खूप गुंतागुंतीची होती. कारण मेंदूत काळ्या बुरशीचं जाळं पसरलं होतं.

    आयजीआयएमएसचे चिकित्सा अधिक्षक डॉ. मनीष मंडल यांनी सांगितलं की, जमुई येथे राहणाऱ्या ६० वर्षीय अनिल कुमार यांना सारखी चक्कर येत होती. त्यात ते वारंवार बेशुद्धावस्थेत जात होते. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत जात होती. चाचणीतून ब्लॅक फंगस असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले.

    Corona Updates Black Fungus in the brain Doctors succeed in removing black fungus from the brain as much as a cricket ball