Indian post

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही पिंवा ज्यांच्याकडे पह्न असला तरी नोंदणी करताना समस्या येत आहेत ते आता जवळच्या पोस्ट ऑफिसची मदत यासाठी घेऊ शकतात.

    कोरोनाला प्रतिबंधित करण्यासाठी विविध  राज्यात धडाक्यात लसीकरण मोहिम सुरु आहे. आता या मोहिमेसाठी टपाल विभागाने सामान्य लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कोरोना लसीकरणासाठी आता पोस्ट ऑफिसमध्ये नोंदणी करता येणार आहे.तेलंगणाच्या ग्रामीण भागात नुकतीच ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ज्या लोकांकडे स्मार्टफोन आहेत, पण ते कोविन अॅप योग्य प्रकारे वापरण्यास सक्षम नाहीत अशा व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. तेलंगणातील ३६ पोस्ट ऑफिस, ६४३ सब पोस्ट ऑफिस आणि १० ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.