लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यावर प्रश्नचिन्ह, अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा असल्याचे झाले स्पष्ट

देशात १ मेपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा (third phase of vaccination)सुरु होत आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये लसींच्या तुटवड्यांचं(vaccine shortage in many states of India) संकट अजूनही कायम आहे.

  देशात १ मेपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा (third phase of vaccination)सुरु होत आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये लसींच्या तुटवड्यांचं(vaccine shortage in many states of India) संकट अजूनही कायम आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी म्हटलं आहे की, दिल्लीमध्ये सध्या लसी उपलब्ध नाहीत. दिल्ली सरकारने लसींचा तुटवडा असल्याची माहिती दिली आहे. दिल्ली सरकारसोबतच ओडिसा आणि जम्मू काश्मिर सरकारनेही १ मे पासून लसीकरणाला सुरुवात करण्यास असमर्थता दर्शवली आहे.

  आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी स्पष्ट केलं आहे की, “दिल्लीमध्ये सध्या लसी उपलब्ध नाहीत. आम्ही कंपन्यांकडे लसींची मागणी केली आहे. जेव्हा त्या उपलब्ध होतील तेव्हा पुढील माहिती दिली जाईल”.

  दिल्लीसोबतच महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांनीही त्यांच्याकडे लसी उपलब्ध नसल्याने १ मे पासून लसीकरण सुरु करता येणार नसल्याचं सांगितलं आहे.
  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज संध्याकाळी ४ वाजता एक बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांसह इतर सर्व अधिकारी या बैठकीत सहभागी होतील.

  सत्येद्र यांनी सांगितलं की, गेल्या दीड महिन्यामध्ये रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण वेगाने वाढत आहे. मात्र गेल्या तीन दिवसांत या प्रमाणात घट झाली आहे ही एक आशादायी गोष्ट आहे.

  ओडिसा सरकारही १ मेपासून लसीकरण सुरु करणार नसल्याचं समोर येत आहे. राज्यात लसींचा पुरवठा उशीरा होणार असल्याने १ मेपासून लसीकरणाला सुरुवात करणं शक्य नसल्याचं समोर येत आहे.  सध्या १२ जिल्ह्यातलं लसीकरण बंद पडलं आहे. त्याचबरोबर जम्मू काश्मिरमध्येही लसींची मागणी केली असून त्यांना पुरवठा झालेला नाही.