कोरोना लस : भारत बायोटेक विकसित Covaxin लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सला आजपासून सुरुवात

कोविड १९ च्या लशीबाबतच्या अनेक उत्साहवर्धक बातम्या गेल्या काही दिवसांत बघायला मिळत आहेत. लस शोधण्याचे प्रयत्न करणाऱ्या विविध कंपन्यांनी त्यांची लस किती परिणामकारक ठरतेय याविषयीचे प्राथमिक निष्कर्ष जाहीर करायला सुरुवात केलीय.त्यातच भारतात आता सिरम इन्स्टिट्युटनंतर भारत बायोटेककडून दिलासादायक बातमी समोर येत आहे.

कोविड १९ च्या लशीबाबतच्या अनेक उत्साहवर्धक बातम्या गेल्या काही दिवसांत बघायला मिळत आहेत. लस शोधण्याचे प्रयत्न करणाऱ्या विविध कंपन्यांनी त्यांची लस किती परिणामकारक ठरतेय याविषयीचे प्राथमिक निष्कर्ष जाहीर करायला सुरुवात केलीय.त्यातच भारतात आता सिरम इन्स्टिट्युटनंतर भारत बायोटेककडून दिलासादायक बातमी समोर येत आहे. हैद्राबाद स्थित भारत बायोटेक विकसित कोविड-१९ वरील Covaxin लसच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स आजपासून बंगळुरु  येथील एका खाजगी रुग्णालयात सुरु होणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्ससाठी आयसीएमआरने (ICMR) आमच्या हॉस्पिटलला परवानगी दिल्याची माहिती वैदेही इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरचे अधिकारी के. रवि बाबू यांनी आयएएनएसला दिली आहे.

-अशी असेल तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्स
तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्स मध्ये तब्बल १००० स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. ही लस स्वयंसेवकांना दोन डोसेसमध्ये देण्यात येईल. पहिला डोस आज देण्यात येईल. तर दुसरा डोस ३० डिसेंबर रोजी देण्यात येईल,मात्र यासाठी स्वयंसेवकांना हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नाही. फोन किंवा व्हिडिओ कॉल द्वारे त्यांचे अपडेट्स, प्रतिक्रीया जाणून घेतल्या जातील, अशी माहिती रवी बाबू यांनी सांगितले. स्वयंसेवकांमध्ये १८ वर्षांपुढील पुरुष आणि महिलांचा समावेश आहे. ही लस प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असल्याने ज्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आहे आणि ज्यांच्यात कोणतेही लक्षणे नाहीत, अशाच व्यक्तींना लस देण्यात येईल. ट्रायल्सचा डेटा राज्यातील Drugs Controller General of India च्या टीमकडे विश्लेषणासाठी पाठवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.