देशात ५ दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा, लस मिळवण्यासाठी राज्य सरकारांचा संघर्ष

भारतात सध्या पुढचे ५ ते ६ पुरेल, एवढाच कोरोना लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार देशात आता केवळ १ कोटी ९६ लाख डोस उरले आहेत. देशात दररोज ३६ लाख जणांना लसीकरण केलं जातं. त्यामुळे पुढचे ५ ते ६ दिवस पुरेल, एवढाच साठा सध्या शिल्लक असल्याचं चित्र निर्माण झालंय. 

    कोरोनाच्या लसींवरून सध्या राज्य सरकारे विरुद्ध केंद्र सरकार असे चित्र अनेक राज्यांमध्ये दिसत आहे. विशेषतः बिगर भाजप सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये कोरोना लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचा आरोप केला जातोय. त्या त्या राज्यांचे आरोग्यमंत्री याबाबत जाहीरपणे भाष्य करताना दिसत आहे. मात्र त्याचवेळी आता देशांतीलच कोरोना लसींचा साठा मर्यादित असल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिल्यामुळे खळबळ उडालीय.

    भारतात सध्या पुढचे ५ ते ६ पुरेल, एवढाच कोरोना लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार देशात आता केवळ १ कोटी ९६ लाख डोस उरले आहेत. देशात दररोज ३६ लाख जणांना लसीकरण केलं जातं. त्यामुळे पुढचे ५ ते ६ दिवस पुरेल, एवढाच साठा सध्या शिल्लक असल्याचं चित्र निर्माण झालंय.

    मात्र पुढील आठवड्यात लसींचा नवा साठा उपलब्ध होणार असल्याचीही माहिती मिळतेय. मात्र हा साठा उपलब्ध होण्यापूर्वी एक ते दोन दिवस अगोदरच लसींचा साठा संपण्याची शक्यता आहे. जर लसीकरणाचा वेग वाढला आणि अधिकाधिक नागरिकांनी या काळात लसीकरण केले, तर लसींच्या साठा संपून नवा साठा उपलब्ध होईपर्यंत एक ते दोन दिवसांचा खंड पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस काही राज्यांना लसींचा पुरवठा होणार नाही, असंही सांगितलं जातंय.

    भारतात सध्या ४५ पेक्षा अधिक वय असणाऱ्यांना लसीकरण करण्यात येतंय. देशात अगोदरच काही राज्यांमधील लसींचा पुरवठा संपला असून नवा साठा उपलब्ध झालेला नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येदेखील लसींचा साठा संपल्यामुळे लसीकरण मोहिमेत खंड पडत असल्याचं चित्र आहे. तर पंतप्रधानांचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीमध्येदेखील सुमारे ६० टक्के लसीकरण केंद्र साठ्याअभावी बंद असल्याचं चित्र आहे.