india become worlds third largest economy will overtake japan

भारतात कोरोनारोधी लसींना मंजुरी मिळाली आहे. 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. लसीकरणाचा मोठा फायदा अर्थव्यवस्थेला होईल. हॉस्पिटॅलिटी, ट्रान्सपोर्ट, इंटरटेनमेंटसारख्या क्षेत्रांमध्ये याचे परिणाम दिसेल.

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क

दिल्ली. भारतीय अर्थव्यवस्थेत ( indian economy) 2021 मध्ये चांगली सुधारणा होत असल्याचा दावा असोचॅमने केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत ‘व्ही-शेप’ सुधारणा होत आहे, असे असोचॅमचे म्हणणे आहे. ग्राहकांचा विश्वास, आर्थिक बाजार, उत्पादन आणि निर्यातवाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे. याचबरोबर, कोरोनारोधी लसीकरण मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग आणखी वाढेल, असेही असोचॅमने म्हटले आहे.

‘व्ही शेप’ सुधारणा

असोचॅमचे सरचिटणीस दीपक सूद यांनी याबाबत सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेत 2021 मध्ये व्ही-शेपमध्ये सुधारणा होईल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 2020 च्या शेवटच्या दोन महिन्यात भारतीय अर्थव्यवस्थेत ‘व्ही शेप’चे स्पष्ट संकेत दिसले आहेत. 2020-21 मध्ये भारताच्या ढोबळ आर्थिक उत्पन्नात अर्थात जीडीपीमध्ये 7.7 टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज आहे. कोरोनामुळे उत्पादन आणि सेवा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारी आकडेवारीत ही बाब स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे.

जीएसटी संकलनात 7 टक्क्यांची वाढ

भारतात कोरोनारोधी लसींना मंजुरी मिळाली आहे. 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. लसीकरणाचा मोठा फायदा अर्थव्यवस्थेला होईल. हॉस्पिटॅलिटी, ट्रान्सपोर्ट, इंटरटेनमेंटसारख्या क्षेत्रांमध्ये याचे परिणाम दिसेल. या सर्व क्षेत्रांवर कोरोनाचा विपरित परिणाम झाला होता. महाराष्ट्रातील जीएसटी संकलनाची आकडेवारी पाहता ग्राहकांनी खरेदीकडे आला मोर्चा वळविला असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राला कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र, असे असतानाही राज्यात जीएसटी संकलनात 7 टक्के वाढ झाली आहे. याचबरोबर, आगामी केंद्रीय अर्थसंकल्पामुळेदेखील भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, असे असोचॅमने म्हटले आहे.

———–